|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत सीमरन बजाजी ठरल्या ‘चार्मिंग लेडी’

कणकवलीत सीमरन बजाजी ठरल्या ‘चार्मिंग लेडी’ 

कणकवलीनृत्य-गीत संगीताच्या तालावर येथे सादर झालेल्या ‘चार्मिंग लेडी’ स्पर्धेला सर्व स्तरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘चार्मिंग लेडी स्पर्धेत सीमरन बजाजी विजेत्या ठरल्या. उपविजेत्या म्हणून सोनल साळगावकर यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना माजी नगरसेविका समृद्धी संदेश पारकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महिला दिनानिमित्त येथील मातोश्री मंगल कार्यालय सभागृहात ‘मिळून साऱयाजणी’ मंचातर्फे सामाजिक कार्यकर्त्या, माजी नगरसेविका नीलम पालव यांच्या संकल्पनेतून दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दुपारी 2.30 पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. रात्री 9 पर्यंत चाललेल्या कार्यक्रमात सादर झालेल्या स्पर्धांमध्ये महिलांनी लक्षणीय सहभाग घेतला. सादर झालेल्या विविध नृत्यांनीही कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. यावेळी कोकण पाटबधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, मिळून साऱयाजणीच्या नीलम सावंत, शीतल पारकर, भार्गविका कराळे, भाग्यश्री रासम, शिल्पा सरुडकर, तेजस लिंग्रस, प्रिती म्हापसेकर, मेधा काणेकर, प्रिया सरुडकर, सुखदा गांधी, दर्शना राणे, नंदा साटम, रिमा साटम, संगीता राणे, माधुरी मेस्त्राr, नीता मयेकर, शीतल मांजरेकर आदी उपस्थित होत्या.

चार्मिंग लेडी स्पर्धेचा निकाल ः उत्कृष्ट पोषाख – मंजिरी वारे, विशेष बुद्धिमान – सौ. सुप्रिया बारवकर, कॅटवाक – अन्वी हर्णे, मिळून साऱयाजणी विशेष पुरस्कार – पूजा कुमार-झारखंड. प्रेक्षकांतून ऑन दि स्पॉट चार्मिंग स्पर्धेत अनिता फराकटे विजेत्या, तन्वी पारकर उपविजेत्या ठरल्या. परीक्षक म्हणून सुमन कदम, हेमा सुर्वे यांनी, कोरिओग्राफर म्हणून संतोष पुजारे यांनी काम पाहिले. यात सुवर्णा आरोलकर, समृद्धी राऊळ, ईशा कांबळे, साक्षी बाईत, सई माणगावकर आदींनी सहभाग घेतला होता.

पाककला स्पर्धा – 1. आरती पाचंगे , 2.उज्ज्वला धानजी, 3. साक्षी माळवदे, हर्षदा दीक्षित या अनुक्रमे विजेत्या ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण निनाद पारकर यांनी केले. यावेळी उद्योगिनी पुरस्काराने शमा दीपनाईक व सहकाऱयांच्या साईकृपा बचत गटाला गौरविण्यात आले. विशेष कर्तृत्ववान महिला म्हणून शीतल संतोष सावंत यांना संदेश पारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विविध कला प्रकार महिलांनी सादर केले. त्याला वन्समोअर देऊन उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. यात तलवार डान्स सुमेधा अंधारी, शैला अंधारी, स्नेहा अंधारी, साक्षी अंधारी, सरिता अंधारी, मनीषा सापळे, शीतल सापळे, मानसी सापळे, गिरीजा मुंज आदींनी सादर केला. तांडव नृत्य शीतल मांजरेकर, ईशा कांबळे, कोमल गोसावी, अनिता पवार, प्रियांका कांबळे, रेखा राठोड यांनी सादर केले.

यावेळी सादर झालेल्या मिक्स डान्सला महिलांनीही शिटय़ा वाजवून प्रतिसाद दिला. हा डान्स स्मिता वालावलकर, मंगल पाटकर, चिन्मय जाधव, संपदा मांलडकर, नीता मयेकर, रेश्मा वालावलकर, दिशा, श्रृती तांबे, भाग्यश्री परब, आरती धुरी यांनी सादर केला. ‘वंदे मातरम्’वर नृत्य देविका अंधारी, सलोनी अंधारी, ऋतुजा मेणकुदळे, अंशु सापळे, तन्वी ओरोसकर आदींनी सादर केले. रेकॉर्ड डान्स प्रिया सरुडकर, शिल्पा सरुडकर, मंदाकिनी साळसकर, दर्शना राणे, भाग्यश्री रासम, सेजल पारकर, संगीता परब, दिशा पुरळकर, तर फनी डान्स रिमा साटम, नंदा साटम, संगीता राणे आणि माधुरी मेस्त्राr यांनी उत्कृष्ट सादर करून रसिकांची दाद मिळविली.

महिला वर्गाचा प्रतिसाद सुखावणारा

कार्यक्रमाला महिलांचा मोठय़ा प्रमाणात मिळणारा प्रतिसाद सुखावणारा आहे. त्यामुळे असे कार्यक्रम होणे ही गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. चार्मिंग लेडी कार्यक्रम यशस्वी होण्यामागे मिळून साऱयाजणीतील माझ्या सर्व सहकारी मैत्रिणींचा मोठा वाटा आहे. मी मात्र निमित्त, असे नीलम पालव यांनी सांगितले.

Related posts: