|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरून मृत्यू

महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरून मृत्यू 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

लेह – श्रीनगर मार्गावरील दराज येथे चंदगड तालुक्यतयील माहिपाळगड यशथील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी घटना घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

महादेव तुपारे यांचा बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरून मृत्यू झाल्याची बातमी सैन्यातील अधिकाऱयांनी तुपारे कुटुंबियांनी गुरूवारी कळवली, महादेव तुपारे हे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात 2005 साली भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कर्यरत होते. लेह- श्रीनगर भागात प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने महादेव यांचे पार्थिव पोहचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Related posts: