|Monday, January 21, 2019
You are here: Home » Automobiles » Hyundai i10 चे प्रॉडक्शन बंद

Hyundai i10 चे प्रॉडक्शन बंद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने आपली लोकप्रिय आय 10 कारचे प्रॉडक्शन भारतातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता प्रिमीयम आणि आधुनिक वाहनांवर जास्त भर देणार असल्यानेच आय 10 चे प्रॉडक्शन बंद करण्यात आले असल्याची देण्यात येत आहे.

ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडने छोटी कार उत्पादन थांबवली आहेत. कंपनीने आय 10 ही कार 2007 मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती. आत्तापर्यंत ह्युदांई आय 10 या मॉडेलची 16 लाख 95 हजार वाहनांची विक्री करण्यात आली आहे. याबाबत कंपनीच्या एका अधिकाऱयाने सांगितले, आम्ही या मॉडेलचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आय 10 ही कार ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. कंपनीकडून या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्यावर लक्ष देत आहोत.

Related posts: