|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेळोली उपकेंद्रास डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार

शेळोली उपकेंद्रास डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार 

वार्ताहर/ कडगाव

  जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभागच्या वतीने देण्यात येणारा डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्रथम क्रमांक कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शेळोली उपकेंद्राने पटकावला.

  जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत 2015-16 च्या कामावर आधारित कै. डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार दिला जातो.राजर्षी शाहू सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाया शेळोली उपकेंद्रास देण्यात आला.या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंकारी,डॉ. दाभोळे,शरद देसाई,सुनीता देसाई,भारती मांगले आदी उपस्थित होते.

फोटो:-डॉ.आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांक पुरस्कारा सह जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर यांच्या सह कडगाव प्राथमिक आरोग्य कर्मचारी.

Related posts: