|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जुगारी अड्डय़ांवरील कारवाईमागे पोलिसांचा आर्थिक व्यवहार ?

जुगारी अड्डय़ांवरील कारवाईमागे पोलिसांचा आर्थिक व्यवहार ? 

प्रतिनिधी / बेळगाव

वरि÷ अधिकाऱयांच्या सूचनेवरुन सध्या मटका व जुगारी अड्डय़ांवर कारवाई करण्याचा सपाटा पोलीस अधिकाऱयांनी सुरु केला आहे. एकीकडे वरि÷ांना दाखविण्यासाठी कारवाई करण्याबरोबरच दुसरीकडे जुगाऱयांबरोबर आर्थिक व्यवहार करुन त्यांना सोडून देण्याचे प्रकारही वाढले आहेत. चार दिवसांपूर्वी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केलेली कारवाई सध्या संशयाच्या भोवऱयात अडकली आहे. यामागे एका वरि÷ अधिकाऱयाचे नाव चर्चेत आहे.

मंगळवारी 7 मार्च रोजी सायंकाळी गुन्हा तपास विभागाचे एसीपी आर. आर. कल्याणशेट्टी व त्यांच्या पथकाने सावगांवजवळील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकला होता. पोलीस उपायुक्त जी. राधिका यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी छापा टाकताच आपली वाहने तेथेच सोडून जुगाऱयांनी तेथून पळ काढला होता.

विशेष पथकातील अधिकाऱयांना केवळ दोघे जण सापडले. सहा मोटार सायकली, तीन ऑटोरिक्षा व एक गुड्स वाहन अशी दहा वाहने जप्त करण्यात आली होती. या पथकातील अधिकाऱयांनी हे संपूर्ण प्रकरण बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे सोपविले. दुसऱया दिवशी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांना अटक केली. 15 हून अधिक जणांचा या जुगारामध्ये सहभाग होता.

पोलीस आयुक्त व उपायुक्तांच्या दट्टय़ामुळे मटका व जुगारी अड्डय़ावर कारवाई सुरु असली तरी जुगाऱयांबरोबर आर्थिक व्यवहार करुन त्यांना सोडून देण्याचे प्रकारही सुरु आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी प्रत्येकांकडून ठराविक रक्कम वसूल केल्याची चर्चा असून एका वरि÷ अधिकाऱयाने या रकमेवर डल्ला मारल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान वरि÷ अधिकाऱयांनाही या प्रकाराची माहिती मिळाली असून त्याची चौकशी होणार आहे, असे समजते. 

Related posts: