|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » LIVE : उत्तरप्रदेश , उतराखंडमध्ये कमळ तर पंजाबमध्ये पंजा

LIVE : उत्तरप्रदेश , उतराखंडमध्ये कमळ तर पंजाबमध्ये पंजा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पाच राज्यातील निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून आत्तापार्यंत उत्तरप्रदेश, उतराखंडमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे तर उतरप्रदेशमध्ये भाजपला आतपर्यंत 205 जागांवर आघाडी वर आहे.समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला ४५ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर बहुजन समाज पक्षाने २६ जागांवर आघाडी घेतली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीची सुरुवात झाली ती समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहाने. समाजवादी पक्षातील ‘यादवी’वरून संभ्रम संपत नव्हता. अखिलेश आणि मुलायमसिंह या पितापुत्रांमधील वादाने पक्षाची नाचक्की झाली. पण शेवटी पितापुत्रांमध्ये समेट झाली आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला. समाजवादी पक्षासमोर आव्हान आहे ते भाजपचे. नरेंद्र मोदी यांच्यावर भिस्त ठेवून भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कंबर कसली.उत्तरप्रदेशमध्ये भाजप २१६ , सपा ६०, बसपा ३५ आणि इतर १२.  त्यामुळे भाजपाला उत्तरप्रदेशमध्ये पूर्ण बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे 

पंजाबमध्ये  आतापर्यंत पंजाबमध्ये काँग्रेस ३३, अकाली १४ तर आपने आत्तापर्यन्त  १५ जागांवर आघाडी मिळवली आहे.  उत्तराखंडमध्ये  भाजप 22, काँग्रेस 10, युकेडी 0, इतर 1अशी परिस्थिती आहे 

Related posts: