|Sunday, January 21, 2018
You are here: Home » Top News » प्रकाशसिंह बादल देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

प्रकाशसिंह बादल देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / लांबी :

पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमनी अकाली दलाला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. बादल हे राज्यपाल व्ही. पी. सिंह बडनोर यांच्याकडे राजीनामा देणार आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 117 जागांच्या मतमोजणी पूर्ण झाली. या मतमोजणीनंतर काँग्रेसला 76 जागा, अकाली दलाला 18 तर आम आदमी पक्षाला 23 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर राज्यात सत्तेवर असलेल्या अकाली दलाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Related posts: