|Monday, September 24, 2018
You are here: Home » Top News » 5 राज्यांच्या विजयाने मोदींच्या कामांवर शिक्कामोर्तब : शाह

5 राज्यांच्या विजयाने मोदींच्या कामांवर शिक्कामोर्तब : शाह 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांवर शिक्कामोर्तब केले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले.

दिल्ली येथे भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मोठय़ा कालखंडानंतर भारतीय जनता पक्षाला तीन चतुर्थांश मते मिळाली आहेत. या विजयाचा वाटा पंतप्रधान मोदींना जात आहे, असे ते म्हणाले.

 

Related posts: