|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » लखलखत्या दुबईत बहरली सरस्वती-राघवची प्रीत

लखलखत्या दुबईत बहरली सरस्वती-राघवची प्रीत 

कलर्स मराठीवरील सरस्वती ह्या प्रेक्षकांच्या लाडक्या मालीकेच कथानक आता एक नवीन वळण घेत आहे … सध्या चर्चेत असलेली सरू-राघवची दुबईवारी प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. निळाशार समुद्र, वाळू, लखलखती दुबई, नवीन जागा याबरोबरच या सगळय़ांमध्ये सरस्वती आणि राघवच प्रेम फुलणार आहे. लग्नानंतर सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर परदेशी  गेले असून ही ट्रीप नक्कीच या दोघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. एका छोटय़ाशा गावामध्ये राहणारी मुलगी आज परदेशी गेली ही बाब तिच्यासाठी वेगळीच आणि उत्सुकतेची आहे.

सरू आणि राघवने अविस्मरणीय क्षण दुबईमध्ये एकमेकांसोबत घालवले. दोघांनीही दुबईमधील निळाशार समुद्र, वाळवंट आणि वाळूमध्ये खेळले, प्रेमाचे मोलाचे क्षण एकत्र घालवले, त्याचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच दोघांनी दुबईचा फेरफटका तर मारलाच पण त्याबरोबर राघवने सरस्वतीला खूप खरेदी देखील करून दिली आणि सरस्वतीला खूश केले. दुबईमध्ये साईटसिंग देखील राघव आणि सरस्वतीने केले, आणि याचदरम्यान राघव आणि सरस्वतीची चुकामूक झाली. पण इतक्या मोठय़ा शहरात सरस्वतीने राघवला शोधून काढले हे महत्त्वाचे. तसेच सरस्वतीला खूश ठेवण्याचा तसेच आपले तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी राघवने दवडली नाही.

पण याच ट्रीपमध्ये सरू आणि राघव बरोबर एक तिसरा व्यक्ती देखील आहे जो या दोघांचा पाठलाग करतो आहे. तो तिसरा व्यक्ती म्हणजे सदाशिव, जो सरस्वतीला मारण्याच्या हेतूने दुबईमध्ये गेला आहे, आणि सरस्वतीचा जीव धोक्यात आहे. त्यांची ही दुबई ट्रीप सुखरूप होईल? सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल? की खरोखरच सरस्वतीचा मफत्यू होईल? सरू पहिल्यांदाच परदेशी जाणार आहे ते पण राघव बरोबर ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करते. सरु आणि राघवच्या या सुखी संसाराला कोणाची नजर तर लागणार नाही ना? राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना? हे सगळं बघणं रंजक ठरणार आहे. या सगळय़ा घडामोडी सरस्वती या मालिकेत 20 ते 25 मार्च दरम्यान संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहेत.

 

Related posts: