|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » स्त्राr मनाचा वेध घेणारा गर्भ

स्त्राr मनाचा वेध घेणारा गर्भ 

श्री स्वामी वक्रतुंड फिल्म्स आणि राजेंद्र आटोळे निर्मित गर्भ या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार ध्वनीफित प्रकाशन सोहळा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या संगीत अनावरण सोहळय़ात मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरची तसेच गीतांची झलक दाखवण्यात आली. सुभाष घोरपडे दिग्दर्शित ‘गर्भ’ चित्रपट 17 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

समाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब आपल्याला सध्याच्या मराठी चित्रपटात पहायला मिळतायेत. प्रेक्षकांच्या याच पसंतीचा विचार करीत मनोरंजनासोबत सामजिक संदेश देण्याच्या उद्देशाने ‘गर्भ’ या कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. आई व मुलाचे नाते अधोरेखित करताना नात्यांचे वेगवेगळे कंगोरे मांडण्याचा प्रयत्न गर्भ सिनेमातून करण्यात आला आहे. कविता (सिया पाटील) व राहुल (सुशांत शेलार) या दाम्पत्याच्या सुखी सहजीवनामध्ये अचानक एक वादळ निर्माण होतं. या वादळाला हे दाम्पत्य कसं सामोरं जातं? सुख-दु:खात एकमेकांना पूर्णपणे साथ देणारं हे दाम्पत्य त्यातून बाहेर पडणार का? याची कहाणी म्हणजे गर्भ सिनेमा.

सिनेमातील कथेला साजेशी अशी सिनेमातील गाणी असून पहिल्या प्रेमाचा स्पर्श नवा, सांग देवा सांग माझा अपराध काय, काळजात आनंद नाचूया बेधुंद, येऊ दे सुख किती, येती जाती संकटे, तुझ्या सवे प्रेमगीत अशा पाच गीतांचा नजराणा या चित्रपटात आहे. अरुण कुलकर्णी यांच्या शब्दांनी सजलेल्या गीतांना अशोक वायंगणकर यांचे संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, वैशाली माडे, नेहा राजपाल, रोहित शास्त्राr, दिशा तूर यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. झी म्युझिकने ही ध्वनीफित प्रकाशित केली आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती शंकर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी केली आहे. चित्रपटाची कथा रमेश तिवारी यांनी लिहिली असून पटकथा धीरज डोकानिया, रमेश तिवारी यांनी लिहिली आहे. संवाद अरुण कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. नफत्यदिग्दर्शन चिनी चेतन याचं आहे. छायाचित्रण अरुण फसलकर (भारद्वाज) याचं असून संकलन अनंत कामत याचं आहे. सिया पाटील, सुशांत शेलार, निशिगंधा वाड, अनंत जोग, यतीन कार्येकर, पल्लवी वैद्य, हेमंत थत्ते, विभूती पाटील, वंदना वाकनीस, वफंदा बाळ आदी कलाकारांच्या यात भूमिका असून आरजे दिलीप गर्भ चित्रपटातून सिनेसफष्टीत पदार्पण करीत आहेत.

Related posts: