|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हेलिकॉप्टरमध्ये चढताना पडल्याने जेटली जखमी

हेलिकॉप्टरमध्ये चढताना पडल्याने जेटली जखमी 

नवी दिल्ली

हरिद्वार येथील रामदेवबाबांच्या आश्रमाला भेट देऊन परतत असताना रविवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जखमी झाले आहेत. आश्रमातून परतताना हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांनी रविवारी रामदेव बाबांच्या आश्रमातील निसर्गोपचार केंद्राला भेट दिली.  त्यांना किरकोळ जखम झाली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांच्यावर अधिक उपचार करण्यात आले. जखमी झाल्यामुळे ते दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आयोजित भाजपच्या विजयी रॅलीलाही विलंबाने सहभागी झाले.

Related posts: