|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापशात भाऊसाहेब बांदोडकर जयंती साजरी

म्हापशात भाऊसाहेब बांदोडकर जयंती साजरी 

प्रतिनिधी/ म्हापसा

गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बांदोडकर यांनी 450 वर्षाच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला ताठ मानेने जगायला शिकविले. राज्यात त्यांनी शिक्षणाची गंगा आणली. राज्यात ज्या पायाभूत सुविधा आणल्या त्यामुळे गोवा राज्य देशातील प्रगत लहान राज्य बनू शकले, असे प्रतिपादन म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी म्हापसा येथे बोलताना केले.

म्हापसा गांधी चौक जवळील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यावर ते बोलत होते. यावेळी नगरसेवक तुषार टोपले, राजसिंग राणे, भाजप मंडळ अध्यक्ष दामोदर लांजेकर, नगरसेवक प्रॅकी कार्व्हाला आदी मान्यवर उपस्थित होते.

म्हापसा मगो प्रेमीतर्फे बांदोडकर जयंती साजरी करण्यात आली. म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, माजी सभापती सुरेंद्र शिरसाट, भारत तोरस्कर, नारायण राटवळ, अमर कवळेकर, एकनाथ म्हापसेकर आदी मगो प्रेमींनी भाऊच्या पुतळय़ास पुप्षहार अर्पण केला.