|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वाघापूर पुलाच्या संरक्षण कठडय़ासाठी बोंब मारो आंदोलन

वाघापूर पुलाच्या संरक्षण कठडय़ासाठी बोंब मारो आंदोलन 

वार्ताहर / यमगे

कागल-भुदरगड या दोन तालुक्यांना जोडणारा वेदगंगा नदीवरील वाघापूर-मुरगूड दरम्यानचा पूल बांधून दोन वर्षे झाली. पण पुलाच्या संरक्षण कठडय़ाच्या लोखंडी पाईप्स पावसाळ्यात काढल्या आहेत. त्या अद्याप बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुलावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या पाईप्स तात्काळ बसवण्यात याव्यात या मागणीसाठी मुरगूड येथील नागरिकांनी होळीच्या पूर्वसंध्येला बोंब मारो आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. पंधरा दिवसात या पाईप्स  न बसवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कागल-भुदरगड या दोन तालुक्याच्या दळणवळणासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱया या पुलाचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले. पुण्याच्या घारपोरे कन्स्ट्रक्शनने हे काम घेतले होते. मुरगूड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राहुल  वंडकर यांच्या नेतृत्वाखाली या पुलावर पाईप्स बसविण्यासाठी होळीच्या पूर्वसंध्येला बोंब मारो आंदोलन केले. यावेळी  संदीप भारमल, साताप्पा डेळेकर, राजू चव्हाण, सर्जेराव आमते, प्रमोद वंडकर, संदेश शेणवी, अमर सुतार, गुंडय़ा चव्हाण, नवनाथ सातवेकर, संदीप वाड, स्वप्नील शिंदे, सचिन सारंग, पप्पू रावण आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.