|Saturday, January 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » रिलीज होण्याआधी रजनीकांतच्या ‘रोबो 2.0’ची 110 कोटींची कमाई

रिलीज होण्याआधी रजनीकांतच्या ‘रोबो 2.0’ची 110 कोटींची कमाई 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘रोबो2.0’येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्या सहा महिने अगोदरच चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. साडेतीनशे काटींचे बजेट असलेल्या ‘रोबो 2.03च़े हक्क ‘झी’ने 110 कोटींना खरेदी केले आहेत.

शंकर यांचे दिग्दर्शन असलेल्या रोबो 2.0चा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. मात्रत्यापूर्वीच तमिळ, हिंदी आणि तेलगु भाषेतील सॅटेलाईट हक्क् झी टेलिव्हिजनने 110 कोटींना विकत घेतले आहेत. लायका प्रॉडक्शन्सचे क्रिएटिव्ह हेड राजू महालिंगम यांनी ही माहिती दिली आहे. ऍमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससोबत डिजीटल राईट्ससाठी चर्चा सुरू आहे. साधारणपणे सॅटेलाईट हक्क कायमस्वरूपी विकले जातात. मात्र इतकी मोठी रक्कम मोजून केवळ 15 वर्षांसाठी सिनेमाचे हक्क विकण्यात आले आहेत. सिनेमाचे थिएटरिकल हक्क अद्याप विकलेले नाहीत.

Related posts: