|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असणे गरजेचे : भोसले

ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असणे गरजेचे : भोसले 

वार्ताहर/ कसबा बीड

इंग्रजी शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन आदर्श पिढी घडू शकते. यासाठी ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कला व सांस्कृतिक मंत्रालयाचे माजी सचिव डी. पी. मेतके-देशमुख यांनी केले. पाडळी खुर्द येथे आविष्कार इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती जी. आर. जाधव होते.

अध्यक्षीय भाषणात जी. आर. जाधव म्हणाले, ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. आविष्कार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अविनाश जाधव म्हणाले, नव्या बदलत्या युगात इंग्रजी शाळांचा ग्रामीण भागात प्रसार होणे गरजेचे आहे.

यावेळी एनआयकेटी या स्पर्धा परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर श्रेणी प्राप्त केलेल्या व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेतील विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्या सुनंदा कदम यांनी केले. स्वाती मुंगळे यांनी आभार मानले.