|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » बलात्कारप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते गायत्री प्रजापतींना अटक

बलात्कारप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते गायत्री प्रजापतींना अटक 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

बलात्काराचा आरोप असलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना बुधवारी लखनऊमध्ये अटक करण्यान आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी सामूहिक बलात्कारप्रकरणातील त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली होती. यापूर्वी आणखी दोघांनी नोएडा आणि जेवारमधून ताब्यात घेण्यात आले होते. तर गायत्री प्रजापती यांचा सुरक्षारक्षक चंदपाल याला 6 मार्च रोजी लखनऊ पोलीस लाईन येथे पाकडण्यात आले होते. राज्यात सत्ताबदल होताच पोलिस तपासाचे चप्रे वेगाने फिरली. प्रजापती याला 24 तासात अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते.

गायत्री प्रजापती आणि त्यांच्या सहा साथीदारांनी तीन वर्षांपूर्वी चहातून गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच पीडित महिलेची आक्षेपार्ह छायाचित्र दाखवून तिला वारंवार ब्लॅकमेल केले जायचे. पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायलयनो 17 फेब्रुवारीला प्रजापती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर जर त्यांच्याविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आले असेल. तर कायद्याच्या चौकटीत जी कारवाई व्हायला पाहिजे ते होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.