|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » Top News » कोल्हापूरात ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड

कोल्हापूरात ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

बॉलिवूड निर्माता -दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमाविरोधातील वाद वाढतच आहेत. कोल्हापुरातील सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे.

पन्हाळागडावरील मसाई पठारावर सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी अज्ञातांनी सेटवरील गाडय़ांची तोडफोड करत जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. य ा प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मवातीच्या सेटवर तोडफोड करून भन्साळींना मारले देखील होते.

Related posts: