|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » Top News » पुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळकपुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक 

PMC-mayoral-mukta-tilak

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे महापलिकेत निवडणुकीत मुसंडी मारून सत्ता काबीज करणाऱया भाजपचे आज इतिहासात पहिल्यांदाज पुण्यात भाजपचे महापौर झाले असून पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे तर उपमहापौरपदी आरपीआय पक्षाचे नवनाथ कांबळे यांची निवड झाली आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या नंदा लोणकर यांचा मुक्ता टिळक यांनी 52 मतांनी पराभव केला. लोणकर यांना मतदानात 46 मते पडली. शिवसेनेनं मतदानाच्या वेळी तटस्थ भूमिका घेतली. पुण्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणे निश्चित होते. 162 पैकी भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11, शिवसेनेला 10, मनसेला दोन जागा मिळवण्यात यश आले आहे.

Related posts: