|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सभापती मडगावकर यांची कलंबिस्तपर्यंत रॅली

सभापती मडगावकर यांची कलंबिस्तपर्यंत रॅली 

सावंतवाडी : कलंबिस्त पंचायत समिती मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा खराखुरा सन्मान आहे. मी तुमच्या आशीर्वादामुळेच सभापती विराजमान होऊ शकलो. तुम्हा सर्वांना अपेक्षित असलेला विकास मी करेन. शेतकऱयांना सहकाराच्या माध्यमातून हा भाग सधन बनविण्याचा आपला मानस आहे, असे नवनिर्वाचित सभापती रवींद्र मडगावकर यांनी स्पष्ट केले.

सभापतीपदी निवड होताच मडगावकर यांची कलंबिस्त पंचायत समिती मतदारसंघात भव्य मिरवणूक काढण्यात आली. येथील काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन मडगावकर यांनी सावंतवाडी गवळीतिठा ते शिरशिंगे गोठवेवाडीपर्यंत रॅली काढली. सर्वप्रथम दाणोली येथील साटम महाराज मठाला भेट देऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर सांगेली गिरीजानाथ देवस्थानला भेट दिली. तेथून सावरवाड देवस्थान, कलंबिस्त, शिरशिंगे, वेर्ले येथे मिरवणूक काढली.

कलंबिस्त येथे आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कॅप्टन दीनानाथ सावंत, अरुण सावंत, सुभाष सावंत, रामा म्हाडगूत, रामा पास्ते, रामा सावंत, विठ्ठल सावंत, रमेश सावंत, ज्येष्ठ नेते शिवाजी सावंत, श्रीपाद नाईक, सरपंच बाळा सावंत, प्रल्हाद तावडे, किरण सावंत, संदेश बिडये, प्रकाश सावंत, यशवंत सावंत, अंतोन रॉड्रिक्स, शिरशिंगे गोठवेवाडी सरपंच सुरेश शिर्के, गणपत राणे, नारायण राऊळ, जीवन लाड, वेर्ले सरपंच चंद्रकांत राणे, शंकर राऊळ, लाडजी राऊळ, शिवा राऊळ, चंद्रकांत राऊळ, वामन नार्वेकर, अभय किनळोसकर, बबन सांगेलकर, सावरवाड सरपंच संजय गोसावी, तुकाराम दळवी, बापू पवार, महेंद्र दळवी, महेश माडगावकर आदी उपस्थित होते.

सहय़ाद्री फाऊंडेशनतर्फे मडगावकर यांचे फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, अध्यक्ष विजय चव्हाण, ऍड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, बाबुराव कविटकर, राजू राणे, प्रमोद सावंत, ऍड. अमोल कविटकर, चंद्रकांत राणे यांनी स्वागत केले.

 

Related posts: