|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांचा कर्जमाफीचा तगादा : मुख्यमंत्री

बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांचा कर्जमाफीचा तगादा : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून विरोधकांचा गोंधळ पहायला मिळत आहे. बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी प्रत्युत्तर देताना केला. तर कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची तरतूद हवी असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभेत कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा विरोधकांचा गोंधळ पहायला मिळाला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. कर्जमाफी करण्यासाठी 30 हजार 500 कोटी रूपयांची आवश्यकता आहे. कर्जमाफी केल्यास विकासासाठी पैसे शिल्लक राहणार नाहीत. विरोधकांना कर्जमाफीवरून केवळ राजकारण करायचे आहे. याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.