|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » धारावीत कॅश व्हॅनवर चोरांचा डल्ला ; दीड कोटी लंपास

धारावीत कॅश व्हॅनवर चोरांचा डल्ला ; दीड कोटी लंपास 

ऑनलाईन टीम / मुंबई :

धारावीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची रोकड घेऊन जाणाऱया कॅश व्हॅनवर चोरांनी डल्ला मारली असून, चोरटय़ांनी दीड कोटी लंपास केले आहेत. ही घटना धारावीतील ओएनजीसी भागात घडली.

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची रोख रक्कम कॅश व्हॅन घेऊन जात होती. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चौघांनी कॅश व्हॅनवर हल्ला चढवला. या चोरटय़ांनी व्हॅनमधील दीड कोटींची रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, चौकशी सुरु आहे.

Related posts: