|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » झाकीरच्या संस्थेवरील बंदी योग्यच

झाकीरच्या संस्थेवरील बंदी योग्यच 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फौंडेशनवर (आयआरएफ) घालण्यात आलेल्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने योग्य ठरविले. आयआरएफच्या खात्यांवरील बंदी हटविण्यासाठी दाखल याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. गृह मंत्रालयाजवळ बंदी घालण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत असे न्यायालयाने म्हटले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 17 नोव्हेंबर 2016 रोजी अधिसूचना जारी केली होती. यात बेकायदेशीर कारवाई अधिनियम अंतर्गत आयआरएफवर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. जानेवारी महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयात या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी गृहमंत्रालयाला नोटीस जारी करून स्पष्टीकरण मागितले होते. गृहमंत्रालयाने बंदीच्या निर्णयावर न्यायलयात आपली बाजू मांडली, ज्यात सर्व पुरावे गोपनीय ठेवत त्यांना बंद लिफाफ्यात न्यायालयसमोर सादर करण्यात आले.

आयआरएफद्वारे देण्यात आलेली वक्तव्ये आणि भाषणांमुळे भारतीय युवांना कट्टरतावादी होण्यापासून रोखण्यासाठी ही बंदी आवश्यक होती. अशी भाषणे इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटनामंध्ये सामील होण्यासाठी युवांना प्रेरित करू शकतात अशी चिंता सरकारने न्यायालयासमोर व्यक्त केली होती.