|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » उद्धव ठाकरे घेणार राष्ट्रपतींची भेट

उद्धव ठाकरे घेणार राष्ट्रपतींची भेट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारा दुपारी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहे. राष्ट्रपती भवनात दुपारी भेट होणार असून उद्धव ठाकरेंची ही सदीच्छा भेट असल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे मंत्रीही दिल्लीत जाणार असून केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत शेतकऱयांच्या कर्जमाफी संदर्भात ते चर्चा करणार आहेत.

शेतकरी कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्यांतरही शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. कर्जमाफीबाबतच केंद्रात कोणाशीही चर्चा करा, काय करायचे ते करा, केंद्रातही कोणाशी चर्चा करा, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झालीच पाहिजे अन्यथा सभागृहात आणि रस्त्यावरही शिवसेना आपला हिसका दाखवेल. असा स्पष्ट इशारा शिवसेननेने विधानसभेत मुख्यमंत्र्यांना दिला होता.