|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » बीएसएनएलकडून 399 रुपयांत प्रतिदिन 2 जीबी 3 जी डाटाबीएसएनएलकडून 399 रुपयांत प्रतिदिन 2 जीबी 3 जी डाटा 

reliance-jioreliancejiobsnl

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतामध्ये रिलायन्स जिओने स्वस्तातील इंटरनेट सुविधा लाँच केल्यानंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपला डाटा प्लॅन स्वस्त केला आहे. त्यामुळे आता बीएसएनएलकडून नवी योजना लाँच करण्यात आली. या योजनेंर्गत ग्राहकाला अवघ्या 399 रुपयांत प्रतिदिन 2 जीबीचा 3 जी डाटा मिळणार आहे.

ग्राहकांनी एकदा या प्लॅनचे रिचार्ज केल्यास संबंधित ग्राहकाला फक्त 399 रुपयांमध्ये महिन्याभरासाठी प्रतिदिवस 2 जीबी 3 जी डाटा ग्राहकांना मिळणार आहे. बीएसएनएलच्या या नव्या योजनेमुळे त्यांनी स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी योजना आणली आहे. ही योजना 90 दिवसांसाठी असणार आहे. या योजनेंतर्गत प्रतिदिन 2 जीबी डाटा याप्रमाणे 28 दिवसांसाठी या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच बीएसएन वगळून अन्य मोबाईल नेटवर्कला प्रतिदिन 25 मिनिटे कॉलिंग मोफत मिळणार आहे. याचबरोबर 25 मिनिटांनंतर प्रतिमिनिट 25 पैशांप्रमाणे दर लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related posts: