|Thursday, August 3, 2017
You are here: Home » Top News » कोल्हापुरात 25 मार्च, तर सोलापुरात एप्रिलपासून पासपोर्ट सेवा केंद्र : गोतसुर्वेकोल्हापुरात 25 मार्च, तर सोलापुरात एप्रिलपासून पासपोर्ट सेवा केंद्र : गोतसुर्वे 

पुणे / प्रतिनिधी :

नागरिकांच्या सोईसाठी पुणे विभागातील सोलापूर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड येथे पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच सुरू केले जात आहे. तर भविष्यात सातारा, सांगली तसेच नगरमध्ये टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी शुक्रवारी येथे दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. याबाबत बोलताना गोतसुर्वे म्हणाले, कोल्हापूरला 25 मार्च, पिंपरी-चिंचवडला 29 मार्च, तर सोलापुरात एप्रिलमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र करण्यात येणार आहे, तर सातारा, सांगली तसेच नगरमध्ये टपाल कार्यालयात पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात येईल. लातूर आणि उस्मानाबादमधील अर्ज हे सोलापूरमधील केंद्राकडे वर्ग करण्याचा संकल्प असून, त्यामुळे या नागरिकांची सोय तसेच नागपूर केंद्रावरील ताण कमी होणार आहे.

पासपोर्ट मिळाल्यानंतरच व्यक्तीला देशाबाहेर जाता येते. पासपोर्ट हे आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम आहे. परदेशातून देशात जे पैसे येतात, त्यामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. 125 कोटींच्या देशात केवळ 4 टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्ट शिबिर, मेळावा अदालत अशाप्रकारच्या सुविधा राबविल्या जातात. यामुळेच पुणे विभागात 2014 साली 2 लाख 10 हजार, 2015 मध्ये 2 लाख 78 हजार, 2016 मध्ये 2 लाख 78 हजार पासपोर्ट वितरित करण्यात आले. 2017 मध्ये हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भविष्यात ग्रामपंचायतीतही पासपोर्ट सुविधा?

2016 मध्ये पासपोर्ट काढण्यासाठीचे नियमही शिथिल करण्यात आल्याने याचा लाभही नागरिक घेत आहेत. याशिवाय मोबाईल व्हॅन्सद्वारेही पासपोर्ट अर्ज स्वीकारण्यात येत आहे. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत फायबर ऑप्टीक केबलद्वारे ग्रामपंचायतीही जोडण्यात येणार असून, त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतीतही पासपोर्ट काढून मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!