|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बांग्लादेशातील सुरक्षा दलाच्या छावणीत आत्मघातकी हल्ला

बांग्लादेशातील सुरक्षा दलाच्या छावणीत आत्मघातकी हल्ला 

वृत्तसंस्था/ ढाका

बांग्लादेशस्थित प्रसिद्ध गुन्हे रोधक शीघ्रकृती दलाच्या छावणीत दाखल झालेल्या एका आत्मघातकी हल्लेखोरांने स्फोटकांचा स्वतःसहीत विस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

या दलाचे कायदे आणि माध्यम विभागाचे निदेशक मुफ्ती महमूद खान यांनी आत्मघातकी हल्लेखोराने आपल्या छावणीलाच लक्ष्य केल्याची पुष्टी केली. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनूसार छावणीतील सार्वजनिक स्नानगृहापाशी या दलातील बहुतेक जवान एकत्र जमलेले असताना हा हल्ला झाला. बांग्लादेशच्या लष्करी, पोलीस, नौदल तसेच वायूदलातील सर्वोत्तम निवडक जवानांचा भरणा असलेल्या या दलावर झालेल्या हल्ल्यात हल्लेखोर मारला गेला, तर दोघे जवान जखमी झाले. हल्लेखोर हा 25 वर्षाच्या  युवक असल्याची माहिती छावनी परिसरात राहणाऱया रहिवाश्यांनी दिली. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत कुंपणाच्या भिंतीवरून त्यांने छावनीत प्रवेश केल्याचेही समोर आले आहे. कट्टर मूलतत्ववाद्याविरूद्ध छेडण्यात आलेल्या मोठय़ा देशव्यापी मोहीमेतंर्गत बांग्लादेशमध्ये 80 हुन अधिक दहशतवादाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादरोधी आणि ट्रान्सनॅशनल क्राईम युनिटकडुन ही कारवाई करण्यात आली.  चितगांवस्थित सीताकुंड येथे धाड घालण्यात आली होती. यावेळी कुख्यात दहशतवादी संघटना जेएमबी च्या दोन आतंकवादय़ांनी अटक टाळण्यासाठी स्वतःला उडवून घेतले होते. याचा सूड उगवण्याखातीर शीघ्र कृती दलाच्या छावनीवर आजचा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा सूरक्षा दलाच्या अधिकाऱयांनी केला आहे.