|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वर्षेपूर्तीनंतरही नमामि चंद्रभागा कागदावरच

वर्षेपूर्तीनंतरही नमामि चंद्रभागा कागदावरच 

पंढरपूर / प्रतिनिधी

गतवर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामधे नमामि चंद्रभगा अभियांनाची घोषणा झाली. या घटनेला एक वर्षे लोटले. त्यानंतर आज नवा अर्थसंकल्प पुन्हा राज्यासमोर सादर होणार आहे. अशा †िस्थतीमधे गतवेळच्या अधिवेशनात घोषणा झालेले नमामि चंद्रभागा अभियान हे कागदावरच राहीलेली दिसून येत आहे.

गतवर्षीच्या अर्थसंकल्पामधे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रभागा नदींच्या शुध्दीकरणासाठी नमामि चंद्रभागा अभियानांची घोषणा केली. या अभियानांचे सर्वच स्तरांतून स्वागत झाले. मात्र गेल्या एक वर्षापासून या अभियानांमधे विशेष असे काही घडले. असे झालेले दिसून आले नाही.इ

  साधारणपणे 18 मार्चच्या दरम्यन अर्थसंकल्पामधे घोषणा झाल्यावर नमामि संदर्भात अनेक तकवितर्क लढवले जाउ लागले. यासाठी सुरूवातीला येथील स्थानिक प्रशासनाकडून चंद्रभागेंच्या स्थितींची देखिल माहीती सरकारने घेतली असल्यांचे समजले. त्यानंतर 5 मे 2016 च्या दरम्यान दस्तुरखुदद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रभागेंची पाहणी केली. यावेळी त्यानी चंद्रभागेंच्या विकासाकरिंता विकास परिषद घेणार असल्यांचे जाहीर केले. त्यानुसार 1 जून रोजी पंढरीत मुख्यमंत्री देंवेंद फ्ढडणवीस जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत विकास परिषद देखिल संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यानी प्राधिकरण स्थापण्यांची घोषणा केली होती.

त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी नगरविकास विभागांच्या एका परिपत्रकानुसार प्राधिकरण देखिल स्थापन झाले. यामधे मुख्यमंत्री अध्यक्ष तर मुनगंटीवार सहअध्यक्ष झाले. आणि यामधेच नमामि अभियानामधे पहील्यांदा कुठली कामे करावयांची आहेत. यांची देखिल रचना करण्यात आली. विकास परिषदेंच्या निमित्ताने नमामि सोबत तुळशीवनांचा तसेच घाटबांधणी आदि पंढरपूरसाठी नविन व विधायक असणारे विकासकामे संकल्पचित्राच्या माध्यातून पुढे आली. त्यामुळे पंढरपूरकरांना आणि एकंदरीतच वारकरी सांप्रदायाच्या डोळयांसमोर नमामिच्या अभियानांचे एक स्वप्नवत असणारे चित्रच उभे राहीले. यानंतर पंढरीत वन विभागाकडून तुळशीवन उभारणीसाठी तुळशींची रोपे देखिल दाखल झाली. तसेच आषाढी यात्रेंच्या दरम्यान सरकारने आणि भाजपाने नमामि चंद्रभागा अभियानांची मोठी जाहीरातबाजी केली. त्यामुळे साहजिकच येत्या वर्षात नमामि अभियानांची धडाक्यांत सुरूवात होईल. अशी अपेक्षा वाटत होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झालेले दिसून आले नाही.

यानंतर कार्तिकी यात्रेंच्या आसपास एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी पंढरपूरचा सहकुंटुब दौरा केला. यामधे त्यांनी सपत्नीक चंद्रभागेंची पूजा केली. तसेच वाळवंटामधे चालत जाउन देखिल पाहणी केली. त्यानंतर तरी नमामिचे काम सुरू होईल. अशी आशा होती. मात्र त्यानंतरही काहीच झालेले दिसून आले नाही.

  वास्तविक पाहीले तर नमामि चंद्रभागा अभियानाचा कालखंड सुमारे पाच वर्षाच्या आसपास निर्धारित केला आहे. यामधे प्रारंभी सुमारे 20 कोंटींचा निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तरी देखिल कुठल्याही प्रकारच्या कामांला सुरूवात झाली नाही. यामधे तुळशीवनांचे काम सुरूवातीला सुरू होईल. असा अंदाज होता. मात्र प्रशासकीय कागदी घोडे या कार्यालयापासून त्या कार्यालयापर्यत फ्ढिरत राहील्याने साधे तुळशी लागवडींचे काम देखिल झाले नाही. त्यामुळे घाटबांधणी सारख्या कामांची अपेक्षा बाळगणे गैरच आहे.

 नमामि चंद्रभागा अभियानामधे भीमाशंकर येथील भीमेंच्या संगामापासून ते पंढरपूरच्या चंद्रभागेंच्या संगामपर्यत संपूर्ण नदींचे शुध्दीकरण होणार होते. यामधे पंढरपूरातील चंद्रभागेंच्या तिरावर घाटबांधणीचा देखिल प्रस्ताव होता. मात्र अद्यापपर्यत त्यांचे साधा निविदांही निघाला नसल्यांचे बोलले जात आहे. त्यामुळे नमामि सारखे महत्वंकांक्षी आणि राज्याला दिशा देणारे अभियान फ्ढक्त भाजपाने दिखाव्यासाठी आणि वाहवा मिळवण्यासाठी केले आहे का ? की वारकरी सांप्रदायांची मतं कायमची भाजपाच्या पारडयात पाडून घेण्यासाठी या अभियानाची घोषणा केली ? असे एक ना अनेक सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे. त्यामुळे नमामि चंद्रभागा अभियानांचे नक्की वास्तव भविष्यामधे काय असणार ? याबाबतचा खुलासा आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनीही सरकारला विचारावे अशी माफ्ढक अपेक्षा यानिमित्ताने पुढे येत आहे.