|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा पालिका मंडळाच्या खास बैठकीत महत्वाचे निर्णय

फोंडा पालिका मंडळाच्या खास बैठकीत महत्वाचे निर्णय 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा दादावैद्य चौक येथील पोस्ट ऑफिस ते ढवळी हा मडगावमार्गे जाणारा रस्ता राज्य महामार्ग अधिसुचित यादीतून वगळून अंतर्गत मार्ग म्हणून मान्यता द्यावी अशा मागणीचा ठराव घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी दिली. फोंडा पालिकेच्या काल झालेल्या खास बैठकीत हा ठराव घेण्यात आला.

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी नवनाथ नाईक, नगरसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते. अंतर्गत मार्ग राज्य महामार्गातून वगळावा अशी मागणीवजा विनंती शहरातील बारमालकांकडून पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार या विषयावर चर्चा करण्यासाठी ही खास बैठक बोलाविण्यात आली होते.

शहरातील राज्य महामार्गच्या 500 मि. अंतर्गत असलेल्या बार व्यवसायिकांवर 1 एप्रिल पासून कारवाईची टांगती तलवार होती. या निर्णयामुळे बहुतेकांना सुट मिळणार आहे. याचा सुमारे शहरातील 50-55 बारमालकांना फायदा होणार आहे. याआधी मोलेमार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग फर्मागुडी ते कुर्टी व बोरी ते ढवळी हे शहराकडे वळविणारे महामार्ग वगळण्यात आले होते.

 तसेच फोंडा मार्केट प्रकल्पात अन्न व औषध संचनालयाच्या अधिकाऱयानी उघडय़ावर सोप्यावर बसणाऱया मसाला व्यापाऱयाना अन्न व औषध खात्याची परवानगी बंधनकारक असल्याची वटहुकुम जारी केला होता. हे सोपस्कर पुर्ण करण्यासाठी सोपोमसालाविक्रेत्यानी पालिकेकडे विक्रि परवान्याची मागणी केली होती. त्यानुसार नोंदणीकृत सुमारे 25 विक्रेत्यांना ती देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

मार्केट प्रकल्पातील नवीन इमारतीत दुकानदाराना स्थलांतर करण्याचाही पालिकेचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related posts: