|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी 225 कोटी : अर्थमंत्री

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी 225 कोटी : अर्थमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील शेतकऱयांना माल साठवणीसाठी गोडाऊनची स्थापन करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे, तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी 225 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱयांना कृषिपंपासाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱयांना तातडीने कर्जे उपलब्ध करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऍग्रो मार्केटसाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱयांना त्यांच्या पालेभाज्या, त्यांचे उत्पादन अधिक काळ राहावे, यासाठी कोल्ड व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबरोबरच सांगलीतील पेठ, यवतमाळ, नाशिक भागात कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे.

Related posts: