|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांची तरतूद : अर्थमंत्री

महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांची तरतूद : अर्थमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अंगणवाडीतील बालकांच्या आहारासाठी 310 कोटींची तरतूद करण्यात येणार असून, शालेय विद्यार्थीनींना सॅनटरी नॅपकीन्स उपलब्ध करुन देण्यासाठी नवी योजना राबवण्यात येणार आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 559 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी 126 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कर्करोगातील तीन प्रकारच्या निदानासाठी अद्ययावत यंत्रणा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी 43 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना अचूक रोग निदानासाठी 31 रुग्णालयात सिटी स्कॅन मशिन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 77 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेसाठी 1 हजार 316 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.