|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » येमेनमध्ये शरणार्थींच्या नौकेवर हल्ला, 40 ठार

येमेनमध्ये शरणार्थींच्या नौकेवर हल्ला, 40 ठार 

सना

 सोमालियन शरणार्थींनी भरलेल्या एका नौकेवरील हल्ल्यामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. नौकेवर हेलिकॉप्टरने गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.  नौकेवरील हल्ल्यात मारले गेलेल्या शरणार्थींजवळ संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्थेद्वारे जारी ओळखपत्र होते. या घटनेत जवळपास 80 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौकेवर नेमका कोणी हल्ला केला याची माहिती अजून स्पष्ट झालेली नाही.  हूती बंडखोरांच्या नियंत्रणाखालील हुदैदा बंदरात तैनात एका अधिकाऱयानुसार नौकेवर हेलिकॉप्टरने हल्ला करण्यात आला. शरणार्थींवर सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी लष्कराने हल्ला केल्याचा दावा बंडखोरांच्या वृत्तसंस्थेने केला आहे. येमेनच्या हवाईसीमेला नियंत्रित करणाऱया आघाडीने या घटनेवर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शरणार्थींनी भरलेली नौका नेमकी कोठे जात होती हे देखील समजू शकलेले नाही.

Related posts: