|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मर्केल यांच्याशी हस्तांदोलनास डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘नकार’

मर्केल यांच्याशी हस्तांदोलनास डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘नकार’ 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कोणतीही वक्तव्यबाजी केलेली नाही, तर हस्तांदोलनावरून ते चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या दौऱयावर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि ट्रम्प यांच्या व्हाइट हाउसमध्ये भेटीनंतर औपचारिक छायाचित्रणावेळी ट्रम्प यांनी मर्केल यांच्याशी हस्तांदोलनास नकार दिला.

ओव्हल कार्यालयात बैठकीनंतर औपचारिक छायाचित्रणावेळी ट्रम्प आणि मर्केल यांना तेथे उपस्थित छायाचित्रकार पुन्हापुन्हा हस्तांदोलन करण्यास सांगत होते, ज्यावर मर्केल यांनी पुढे येत ट्रम्प यांना हस्तांदोलनाविषयी विचारत राहिल्या, परंतु ट्रम्प यांनी याकडे डोळेझाक करत आपले तोंड दुसरीकडे फिरविले. ट्रम्प यानीं आपले हात गुडघ्याजवळ ठेवत मर्केल यांच्याकडे पाहणे देखील टाळले. दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीनंतर ट्रम्प यांच्या वर्तनामुळे त्यांच्यातील चर्चा सौहार्दपूर्ण ठरली नसल्याचे जाणवले.सोशल मीडियावर या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.