|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 1 लाख मदरशांमध्ये शौचालयांची निर्मिती करणार केंद्र सरकार

1 लाख मदरशांमध्ये शौचालयांची निर्मिती करणार केंद्र सरकार 

नवी दिल्ली 

 केंद्र सरकारने आपल्या ‘3 टी’ मंत्राच्या अंमलबजावणीच्या दिशेने योजना बनविण्यास प्रारंभ केला आहे. यांतर्गत देशाच्या 1 लाख मदरशांमध्ये शौचालय निर्मितीची योजना बनविण्यात आली आहे. मध्यान्ह आहार योजनेबरोबरच आपल्या 3 टी सूत्रांतर्गत (टॉयलेट, टिफिन आणि टिचर) शिक्षकांच्या गुणवत्तेत देखील सुधार करण्याची योजना बनविल्याचे अल्पसंख्याक विषयक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले. मुख्य प्रवाहातील शिक्षण उपलब्ध करविण्यासाठी मदरशांना सरकार मोठय़ा प्रमाणात मदत करणार आहे. यासाठी आमच्याजवळ 3-टी सूत्र देखील आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत 1 लाख मदरशांमध्ये शौचालय निर्मितीची योजना बनविल्याचे त्यांनी सांगितले. पहिला टी-शौचालयासाठी, दुसरा टी-आहाराकरता आणि तिसरा टी-शिक्षकांसाठी आहे.

 ज्या मदरशांमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेत सुधाराची गरज आहे अशांची ओळख पटवून इतर कार्यक्रमांद्वारे त्यांना प्रशिक्षित केले जाईल. बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती आणि गरीब नवाज कौशल्यविकास सारख्या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा. आतापर्यंत 20000 विद्यार्थिनींना बेगम हजरत योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत या संख्येत वाढ करून हे प्रमाण 45000 वर नेण्याचे लक्ष्य असल्याची माहिती नकवी यांनी दिली.