|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्मार्ट सिटीच्या कामाला वेग, दोन वर्षात दिसणार विकास -मिलींद म्हैसकर

स्मार्ट सिटीच्या कामाला वेग, दोन वर्षात दिसणार विकास -मिलींद म्हैसकर 

वार्ताहर/ सोलापूर

सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध कामांचा येत्या दोन वर्षाचा आराखडा लवकरच तयार होणार आहे. शहरातील 46 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील रस्ते आणि ई-टॉयलेट, सायकल ट्रक, आदी कामांना लवकरच सुरुवात होणार असून दोन वर्षात नक्कीच बदल दिसेल असा विश्वास स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तथा पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केला.

      सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची सातवी बैठक शनिवारी अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी उपस्थित संचालक मंडळाच्या  समोर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सोलापूर महापालिका आयुक्तच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते सुरेश पाटील, विरोधी पक्ष नेते महेश कोठे, संजय कोळी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आयुक्त्? विजय काळम-पाटील,पोलीस आयुक्त्? रवींद्र सेनगावकर, नगरविकास विभागाचे उपसचिव पी.के.धसमाना, कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तेली, राजशेखर पाटील आणि प्रा.नरेंद्र काटीकर उपस्थित होते.

        अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या विकास कामांचा येत्या दोन वर्षाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या रंगभवन ते डफरीन चौक, आंबेडकर चौक मार्गे भैय्या चौकाच्या मॉडेल रस्त्याची निविदा येत्या दहा दिवसात निघाडार असून लवकरच कामास सुरुवात होईल. त्यानंतर सध्या शहरत दोन इ-टॉयलेट बसविले असून शहरात कुठेही आवश्यक असल्यास शेकडो असे ई -टॉयलेट बसलें जातील. त्यामुळे सहज सुविध मिळणाऱ्या शहरामध्ये सोलापूरचे नाव देशात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हैसकर यांनी सांगतले.

        या आराखडयात समावेश करावयाच्या 46 कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होईल त्यांची सोय होईल याकडे लक्ष दिले जाईल. प्राथमिक स्तरावर  कामाच्या दर्जेला अणीवविण्याला प्राधन्य असेल असेही ते म्हणाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असणा-या कामांना संबंधित प्रकल्प व्यवस्थापन कंपनीची तांत्रिक मान्यता असणे आवश्यक आहे. तांत्रिक मान्यतेनंतर संचालक मंडळ प्रशासकीय मान्यता देईल.

     बैठकीत पहिल्या टप्प्यात सुरु करावयाच्या 14 विविध कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये स्मार्ट रोड, ई टॉयलेट उभारणी, हुतात्मा गार्डन विकास, कमांड अँड कंट्रोल सेंटर, स्मार्ट किऑस्क, वेब पोर्टल, ओपन जिम,अर्बन गॅलरी,प्रधन मंत्री आवास योजना, सोलरारुफ टॉप बिल्डींग, नाईट मार्केट, सिध्देश्वर तलाव विकास आदींचा समावेश आहे.या सर्व विकास कामांसाठी सुमारे 260 कोटी रुपयांचा निधी खर्च होण्याची अपेक्षा आहे.