|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अंतिम टप्प्यात पालिकेचा कर वसुलीचा धडाका सुरू

अंतिम टप्प्यात पालिकेचा कर वसुलीचा धडाका सुरू 

प्रतिनिधी/ कराड

कराड नगरपालिकेसह मलकापूर नगरपंचायतीने कर वसुली मोहिमेसाठी जोर लावला असून अधिकारी, कर्मचारी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. कर वसुली मोहिमेची धास्ती नागरिकांना असून पालिकांमध्येही कर भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

मार्चच्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम तीव्र करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पालिकांना कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराड नगरपालिकेने कर वसुली मोहिमेसाठी प्रयत्न सुरू केले. सुरूवातीला नोटीस बजावल्यानंतरही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱयांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर तब्बल 64 मिळकतींना नगरपालिकेने सील केले. नगरपालिकेच्या परवानगीशिवाय सील तोडणाऱयांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिला. कर वसुली अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटच्या आठवडय़ात वसुलीला जोर लागला आहे.

मलकापूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्या संकल्पनेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे वसुली मोहिम सुरू झाली आहे. जलअभियंता यु. पी. बागडे, अभियंता बनसोडे, ज्ञानदेव साळुंखे, संजय घाडगे, ए. पी. मोहिते, श्रीकांत शिंदे, रामचंद्र शिंदे, दीपक गावडे, जगन्नाथ मुडे, वैशाली रेके यांची वसुलीसाठी नियुक्त केली आहे.  वसुलीसाठी जोर लावला आहे.