|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी टिप्पर चालकाला अटक

बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी टिप्पर चालकाला अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी सीसीबीच्या अधिकाऱयांनी देसूर येथील एका टिप्पर चालकाला अटक करून टिप्पर जप्त केला आहे. शनिवारी ब्रह्मनगरजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी शनिवारी ब्रह्मनगरजवळ केए 22 बी 9811 क्रमांकाचा टिप्पर अडवून तपासणी केली असता कोणत्याही परमिटशिवाय वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. हा टिप्पर गंगाराम कोडचवाडकर यांच्या मालकीचा असल्याचे आढळून आले.

टिप्पर चालक दत्तात्रय नारायण मनवाडकर (वय 53, रा. देसूर) याला अटक करून वाळूसह टिप्पर जप्त केला आहे. यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात भा.दं.वि. 379, सहकलम 34, 4 (1) (ए), 21, 22, एमएमआरडी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.