|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतल्या 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची शिवसेनेची मागणी

मुंबईतल्या 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची शिवसेनेची मागणी 

ऑनलाईन टीम /मुंबई :

मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला.

पश्चिम मार्गावरील एलफिन्स्टनं स्टेशनचं नाव प्रभादेवी, तर मुंबई सेंट्रलचं नाव नाना शंकर शेठ, तर चर्नी रोड स्टेशनला गिरगाव स्टेशन असं नाव देण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावरील करी रोडला लालबाग स्टेशन आणि स्टॅडहर्स्ट स्टेशनचं नाव डोंगरी स्टेशन करावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या स्टेशनच्या नावांवर आक्षेप घेतला आहे. ‘ही नावं ब्रिटीश काळापासून आहेत. त्यामुळे ही बदलली गेली पाहिजेत. बॉम्बेचं मुंबईहून अनेकजण आजही बॉम्बेच म्हणतात.’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.