|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करणार सरकार

ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करणार सरकार 

नवी दिल्ली

दारिद्य्ररेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार 477 कोटी रुपयांच्या तरतुदीसह एक योजना सुरू करणार आहे. चालू आठवडय़ात सुरू होणाऱया या योजनेंतर्गत सरकार ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र आणि व्हिलचेअरसमवेत वयसंबंधी सहाय्यक उपकरणे मोफत प्रदान करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि माहिती तसेच प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू 25 मार्च रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिह्यात प्रस्तावित राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करतील. याचप्रकारचे एक शिबिर 26 मार्च रोजी मध्यप्रदेशच्या उज्जैन येथे होणार आहे. योजनचे लक्ष्य आर्थिक रुपाने दुर्बल गटातील ज्येष्ठांना ही सहाय्यक उपकरणे प्रदान करून त्यांना सक्रिय जीवनात आणणे आणि वृद्धांसाठी अनुकूल समाजाची निर्मिती करणे असल्याचे मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने सांगितले. योजनेतर्गत सरकारने प्रत्येक शिबिरात 2000 लाभार्थ्यांना अशी उपकरणे वितरित करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. योजनेसाठी विभागाने तीन नावे सुचविली होती, ज्यातील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नावावर पंतप्रधान कार्यालयाने आपली मान्यता दिली होती.

 

Related posts: