|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » परफॉर्मन्स बेससाठी प्रतिनिधींनी चांगले काम केले पाहिजे

परफॉर्मन्स बेससाठी प्रतिनिधींनी चांगले काम केले पाहिजे 

पुलाची शिरोली / वार्ताहर

भविष्यात परफॉर्मन्स बेस राजकारण होणार असल्याने प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सातत्याने चांगले काम केले पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनसह जिल्ह्य़ातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने स्मॅक भवन येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

   स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागलचे (मॅक) अध्यक्ष संजय जोशी, गोशिमाचे अध्यक्ष जे. आर. मोटवानी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय अंगडी प्रमुख उपस्थित होते.

    खासदार महाडिक म्हणाले, उत्तम दर्जाचे वाचन, जनतेच्या प्रश्नांची जाण आणि संसदेत हे प्रश्न कसे मांडायचे याचा अभ्यास यामुळेच आपण टॉप वन खासदारचा सन्मान मिळवू शकलो. कोकण रेल्वे, नियमित विमान सेवा, पासपोर्ट कार्यालय, ईएसआय हॉस्पीटल, रेल्वे प्लॅटफॉर्म रेजिंग, कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गाचे दूपदरीकरण, कोल्हापूरचा बास्केट ब्रीज अशा विविध विषयांवर केंद्र शासनाकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.

    कोल्हापूरच्या जडणघडणीत उद्योजकांचे मोलचे योगदान आहे. पण कोल्हापूरच्या उद्योग वाढीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. क्लस्टर योजनेचा त्याला अपवाद आहे. त्यामुळे उद्योजकांचे एक शिष्टमंडळ सोबत घेऊन दिल्लीतील संबंधित विभागांशी चर्चा करून उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, गोशिमाचे संग्राम पाटील, मॅकचे अध्यक्ष संजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला.

    याप्रसंगी झंवर ग्रुपचे संचालक निरज झंवर, मयूरा स्टीलचे अध्यक्ष चंद्रशेखर डोली, शगून कास्टिंगचे अध्यक्ष शामबाबू तोतला, फौंड्री ऍण्ड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक शेखर कुसाळे, स्मॅकचे संचालक, दीपक पाटील, रामराजे बदाले, डी. एन. कामत, अतुल पाटील, उद्योजक प्रताप पुराणिक, प्रकाश राठोड, एम. वाय. पाटील, आप्पा हजारे, संजय भगत, प्रकाश जगदाळे, नितेश पटेल, सचिव टी. एस. घाटगे आदी उपस्थित होते. अध्यक्ष राजू पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दीपक परांडेकर यांनी आभार मानले.

Related posts: