|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिराळा नागपंचमीला ‘कायदा’ बदलाचाच उतारा..!

शिराळा नागपंचमीला ‘कायदा’ बदलाचाच उतारा..! 

महादेव पाटील/ शिराळा

लोकभावनेचा विचार करता न्यायालयीन वेटोळ्यात अडकून पडलेल्या शिराळकरांच्या नागपंचमीला बंधमुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी कायद्यामध्ये बदलाव आणणेच गरजेचे व उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक यासाठी सार्वत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे मत कायदेशीर जाणकारांचे आहे.

जगविख्यात व जगप्रसिध्द असणाऱया शिराळकरांच्या नागपंचमीला कायद्याचे ग्रहन लागले आहे. हे ग्रहन 2002 पासून लागले असून ते अद्यापपर्यंत तसेच राहीलेले आहे. निसर्गप्रेमी व प्राणीमित्र लोकांच्या कडून शिराळकरांच्या जिवंत नाग खेळवण्याच्या नागपंचमी उत्सवाबाबतीत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. हा आक्षेप हा न्यायालयीन असल्याने त्यावरती जी बंधणे आली आहेत. ती बंधणे कठोर व बंधमुक्त न होणारी आहेत. न्यायालयात धाव घेण्यात आलेल्या निसर्गप्रेमींनी वन्यजीव कायद्याचा आधार घेवूनच न्यायालयीन लढा ठेवला आहे.

गेल्या शेकडो वर्षापासून शिराळकरांचा हा नागपंचमी उत्सव सुरु आहे. त्याला रुढी-परंपरा असून एwतिहासीक आधारही आहे. प्राचीन काळापासून सुरु असणाऱया या नागपंचमीचे विशिष्टय़ेपुर्ण उल्लेख साहीत्यामध्येही आढळून येत आहेत. त्याचमुळे येथील नागपंचमी ही जगविख्यात व जगप्रसिध्द झाली आहे. नागपंचमीला होणारी जिंवत नागांची पुजा हे या उत्सवाचे सर्वात महात्वाचे वैशिष्टय़े असून याच बाबीचे आश्चर्य सर्वत्र परिचीत झाले आहे. साहीत्यातून तसेच दुरचित्रवाणी वरुन येथील नागपंचमीचे वर्णन चित्रित करण्यात आले आहे. अशा आश्चर्यकारक असणाऱया नागपंचमीची भुरळ सर्वानां पडली आहे.

परंतू अशी ही लोकभावनेचा आरग ठरलेली ‘नागपंचमी’ आता कायद्याच्या वेटोळ्यात अडकून पडली आहे. कायदेशीर बंधणे आल्याने येथे आता पारंपारिक पध्दतीने नागपंचमी साजरी केली जात नाही. नागप्रतिमांचे पुजन करुन मिरवणूका काढल्या जात आहेत. अशा पध्दतीने हा उत्सव साजरा करण्यात शिराळकरांना अजिबातच गोडी वाटेनाशी झालेली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. शेकडो वर्षापासून येथे हा उत्सव मोठय़ा श्रध्देने साजरा केला जात होता. तोच आता जर कायदेशीर बंधणात अडकला जात असेल तर येथील नागरिकांची आवस्था ही अशीच गोडी नसणारीच असणार हे सत्यच आहे.

कायद्याच्या कचाटय़ात अडकलेल्या नागपंचमीला सोडविण्यासाठी शिराळकरांचे हरतरेचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू शिराळकरांना अद्याप योग्य रस्ता सापडलेला नाही. शिराळकर न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले आहेतच. परंतू ‘मायबाप’ सरकारकडेही याचना करत बसलेले आहेत. मायबाप सरकारकडे त्यांचे अनेक वर्षापासूनचे हेलपाटे सुरु आहेत. मायबाप सरकारमधील लोकप्रतिनिधींनी यासबंधी आश्वासनेही दिलेली आहेत. परंतू याकडे मायबाप सरकारणे अद्यापपर्यंत पुरेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच आमची नागपंचमी पुर्ववत सुरु झालेली नाही असे शिराळकरांचे मत आहे.

सध्या याबाबतीत काही अनोख्या गोष्टी पुढे येवू लागल्या आहेत. शिराळकरांचा न्यायालयीन लढा चालूच रहीला पाहीजे. परंतू यासोबत महत्वाची बाब आहे ती म्हणजे ‘वन्यजीव’ बाबतचा कायदा बदलणे. हा कायदा जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत शिराळकरांचा न्याय हा धुसरच ठरेल. कारण कोणताही कायदेशीर सल्लागार हा उपलब्ध असणाऱया कायद्याचा आधार घेवूनच कायदेशीर लढाई करणार आहे. परंतू जर नागपंचमीसाठीचा कायदाच जर अस्तित्वात नसेल तर कायदेशीर लढाई अपूरी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे शिराळकर जोपर्यंत ‘कायदा’ बदलाची लढाई करत नाहीत. तोपर्यंतचे शिराळकरांचे धावणे हे फक्त दमण्यासाठीच असेल. असे कायदेशीर जाणकारांचे मत आहे. शिराळकरांच्या लोकभावनेचा विचार करता ‘नागपंचमीला’ पुर्ववत रुप यावे व येणे आवश्यकच आहे. पण त्याकरीता योग्य मार्गाचा अट्टाहास शिराळकरांच्या कडून होणे गरजेचे आहे. हे राजकीय ईच्छाशक्तीच्या माध्यमातून घडू शकणारे आहे. विधिमंडळात नागपंचमी संदर्भातील सध्या जे कायदे आहेत ते बदलणे किंवा त्यामध्ये शिथीलता करुन आणणे हे पर्याय शिराळरांच्या पुढे आहेत. शिराळकरांनी ‘हार्ड’ वर्क ऐवजी ‘शार्प’ वर्कला महत्व देणेच गरजेचे आहे.