|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चांगल्या कामाचे पुरस्कारामुळे सार्थक!

चांगल्या कामाचे पुरस्कारामुळे सार्थक! 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

तळागाळापर्यंत पोहोचून केलेल्या चांगल्या कामांमुळे मिळालेला हा पुरस्कार म्हणजे यशाचे खरे गमक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी येथे केले. ओरोस येथील आदर्श मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार वितरण सोहळय़ात त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषद महिला बालविकास विभागामार्फत अंगणवाडीसाठी उत्कृष्ट काम करणाऱया तीन मुख्य सेविका, 49 अंगणवाडी मदतनीस, 49 कार्यकर्ती व आठ मिनी अंगणवाडी कार्यकर्ती अशा 109 कर्मचाऱयांना सन 2016-17 चा आदर्श पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्कारांचे वितरण ओरोस येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले.

वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, समिती सदस्या कल्पिता मुंज, विभावरी खोत, सुगंधा दळवी, रुक्मिणी कांदळगावकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.

सभापती वळंजू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य सेविका जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे परितोषिक वैभववाडी नं. 2 प्रभागातील कविता गवाणकर यांना, द्वितीय क्रमांक परुळे प्रभागाच्या हेमलता देसाई तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक फणसगाव प्रभागाच्या शुभांगी काणकेकर यांना प्रदान करण्यात आला. शेखर सिंह यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱयांनी यापुढील राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

मागील दोन वर्षापासून रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारीपदाची धुरा सांभाळणाऱया आठही तालुक्यातील मुख्य सेविकांच्या सीडीपीओ म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याबाबत सभापती व सीईओंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जि. प. महिला व बालविकास विभागाच्या सर्व टीमचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त मुख्य सेविकांमधून मनोगत व्यक्त करताना हेमलता देसाई यांनी हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी मागील अखंड सेवेत ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा हा पुरस्कार असल्याची भावना व्यक्त केली. अंगणवाडी सेविकांमधून कणकवली
प्रकल्पातील शीतल सावंत यांनी हा भाग्याचा सोहळा असल्याचे सांगितले.

Related posts: