|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राज्यातील दहा भाजप खासदारांना व्हायचंय आमदार!

राज्यातील दहा भाजप खासदारांना व्हायचंय आमदार! 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्यासह राज्यातील दहा भाजप खासदारांना आमदारकीचे वेध लागले आहेत. पुढच्या वषी विधानसभेसाठी होणाऱया निवडणुकीत रिंगणात उतरण्याची इच्छा या खासदारांनी पक्षश्रे÷ाrकडे व्यक्त केली असून मंत्रिपदावर डोळा ठेवून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ते उत्सुक आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत खास करुन उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या यशानंतर कर्नाटकातही पुढच्यावषी भाजप सत्तेवर येणार या आशेने पक्षाच्या खासदारांना आमदारकीचे वेध लागले आहेत. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार बी. एस. येडियुराप्पा यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खासदारांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली जाणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

पक्षाच्या या भूमिकेमुळे आमदारकीचे स्वप्न पाहणाऱया खासदारांचा हिरमोड झाला आहे. खासदार सुरेश अंगडी, शोभ करंदलाजे, बी. श्रीरामलु, पी. सी. मोहन, प्रताप सिंह, करडी संगन्ना, अनंतकुमार हेगडे, पी. सी. सिद्धेश्वर यांच्यासह दहा खासदारांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पक्षश्रे÷ाrंची सध्याची भूमिका लक्षात घेता या खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्मयता कमी आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे येडिंच्या नावाचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खासदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पक्षाने इच्छुकांना दिला आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर कर्नाटकात पुढच्या वषी होणाऱया विधानसभेत कोणतापक्ष सत्तेवर येणार? काँग्रेसमुक्त कर्नाटकाचे स्वप्न पाहणाऱया भाजप नेत्यांचे स्वप्न पूर्ण होणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अश्वमेध रोखण्यात कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्वाला यश येणार का? आदी प्रश्नांभोवती राजकीय नेत्यांमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

 150 संख्याबळ मिळविण्याचा संकल्प

भाजपने मिशन 150 अभियानांतर्गत पुढच्या निवडणुकीत कर्नाटकात किमान 150 संख्याबळ मिळविण्याचा संकल्प केला आहे. नरेंद्र मोदी यांची लाट भाजपला लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आमदारकीची निवडणूक लढविली तर मंत्रीपद मिळेल, ही शक्मयता गृहित धरुन दहाहून अधिक खासदारांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. उमेदवारी देताना उत्तर प्रदेश पॅटर्न राबविण्याचा विचार अमित शहा यांनी केला आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात  रंगली आहे.