|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » leadingnews » अदित्यनाथांनी मंत्र्यांना दिले संपत्ती जाहीर करण्याचे आदेशअदित्यनाथांनी मंत्र्यांना दिले संपत्ती जाहीर करण्याचे आदेश 

yogi

ऑनलाईन टीम /लखनौ :

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ हे कामाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करणार असे दिसते. पदभार स्वीकारताच आदित्यनाथ यांनी मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांना 15 दिवसात संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचाराच नायनाट करण्यावर भर दिला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

रविवारी योगी अदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला, योगी अदित्यनाथ पदभार स्वीकारल्यावर लोकभवनामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत योगी अदित्यनाथांनी सर्व मंत्र्यांना संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. वार्षिक उत्पन्न, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील आता मंत्र्यांना द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलेला हा पहिला आदेश आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच सर्व मंत्र्यांचा संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. योगी अदित्यनाथांनीही या बाबतीत मोदींचेच अनुकरण केले असे दिसते.

Related posts: