|Thursday, August 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » आयडिया – वोडाफोन ‘साथ -साथ’

आयडिया – वोडाफोन ‘साथ -साथ’ 

ऑनलाईन टीम /मुंबई :

आयडिया आणि वोडाफेन या देशातल्य दिग्गज मोबाईल सेल्युलर कंपन्यांचे लवकरच विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन झालेली नवीन कंपनी ही देशातली सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी असेल.

आयडीया कंपनीच्या संचालक मंडळाने ही घोषणा केली आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन होणाऱया कंपनीत तब्बल 40 कोटी ग्राहक असणार आहेत. नवीन स्थापन होणाऱया कंपनीत वोडाफोनची 45.1 टक्के भागीदारी असेल तर आयडीयाची 26 टक्के भागीदारी असणार आहे. उर्वरित 35 टक्के बाजारतले इतर भागीदार असतील. रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी मोबाईल क्षेत्रातल्या या दिग्गज कंपन्या एकवटल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी वोडाफोनने आपल्या फोरजी इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.