|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि. प. अध्यक्ष निवड आजजि. प. अध्यक्ष निवड आज 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड 21 मार्च रोजी होत आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने जि. प. वर बहुमत असलेल्या काँगेसमधून अनेक इच्छूकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे निवडीची उत्सुकता वाढली आहे. शिवसेनेकडूनही अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने निवडीतील रंगत वाढली आहे.

सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दुपारी 3 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेला सुरुवात, 3 ते 3.10 नामनिर्देशनपत्रांची छाननी, 3.11 ते 3.15 नावे घोषित करणे, 3.16 ते 3.30 नामनिर्देशनपत्र मागे घेणे, 3.31 ते 3.34 निवडणूक लढविणाऱया उमेदवारांची यादी घोषित करणे, 3.35 वाजता आवश्यकता वाटल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जि. प. वर काँगेसचे बहुमत असल्याने काँग्रेसमधूनच अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होणार आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने काँगेसमध्ये रेश्मा सावंत, संजना सावंत, सरोज परब, सावी लोके यांची नावे चर्चेत आहे. उपाध्यक्षपदासाठी रणजित देसाई, सतीश सावंत, बाळा जठार, दादा कुबल, संजय आंग्रे यांची नावे चर्चेत आहे. मात्र नारायण राणे ठरवतील, तोच उमेदवार अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहे. धक्कातंत्राचा वापर झाल्यास चर्चेतील नावे बाजूला पडून अनपेक्षित नावे पुढे येऊ शकतात.

जि. प. वर काँग्रेसला बहुमत असले, तरी शिवसेनेनेही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी वर्षा पवार, तर उपाध्यक्षपदासाठी संजय पडते यांचे नाव सूचविण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेने लढवली आणि काँग्रेसचे काही सदस्य अनुपस्थित राहिले, तर निवडणुकीत रंगत येणार आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!