|Friday, July 28, 2017
You are here: Home » उद्योग » सर्वात स्वस्त स्मार्टफोन शाओमीकडून दाखलसर्वात स्वस्त स्मार्टफोन शाओमीकडून दाखल 

नवी दिल्ली

: शाओमी या कंपनीने रेडमी 4ए हा सर्वात कमी किमतीतील स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला. 4जी सेवायुक्त असणारा हा स्मार्टफोन गुरुवारपासून ऍमेझॉन आणि कंपनीच्या एमआय वेबसाईटवर उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची बॉडी पॉली कार्बोनेटची असून हायब्रिड डय़ुअल सिमचा वापर करण्यात आला. 128 जीबीपर्यंत स्टोरेज क्षमता वाढविण्याची सुविधा असून फास्ट चार्जिंगची सेवा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन भारतीय बनावटीचा असून आंधप्रदेशमधील श्रीसिटी येथे उत्पादन घेण्यात येते. ऑफलाईन बाजारात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार नाही. डार्क ग्रे, गोल्ड, रोझ गोल्ड या रंगात उपलब्ध होणाऱया या स्मार्टफोनची किंमत केवळ 5,999 रुपये आहे.

या स्मार्टफोनची वैशिष्टय़े

डिस्प्ले 5 इंच एचडी

प्रोसेसर स्नॅपड्रगन 425

रिअल कॅमेरा 13 मेगाफिक्सल

सेल्फी कॅमेरा 5 मेगाफिक्सल

स्टोरेज 16 जीबी, रॅम 2 जीबी

ऑपरेटिंग प्रणाली ऍन्ड्रॉईड 6.0

बॅटरी 3120 एमएएच

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!