|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डिजिटल शाळांसाठी 50 लाख रु.

डिजिटल शाळांसाठी 50 लाख रु. 

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा डिजिटल बनवण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न सुरू आहेत. शासनानेही डिजिटल शाळा बनविण्यासाठी 58 शाळांना 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जि. प. चे शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालेकर यांनी पत्रकारांना दिली

सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नेहमीच अग्रेसर आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही शैक्षणिक क्षेत्रात जि. प. च्या शाळा कुठे मागे पडू नयेत, यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून डिजिटल शाळा बनविण्याचे काम जिह्यात सुरू असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. भविष्यात सर्व शाळा डिजिटल शाळा झाल्यास निश्चित मुलांमध्ये अधिक शैक्षणिक प्रगती साधता येणे शक्य आहे. इंग्रजी माध्यमाच्या व शहरातील शाळांशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे.

शासननेही डिजिटल शाळा होण्यासाठी हात पुढे करत 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून 58 शाळा डिजिटल शाळा बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेला 85 हजार 881 रुपयांचा निधी दिला जाणार आहे, अशी माहिती सभापती पालेकर यांनी दिली.