|Friday, August 4, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजपची जम्बो मोर्चेबांधणीभाजपची जम्बो मोर्चेबांधणी 

प्रतिनिधी/ बेंगळूर

उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशातील निवडणूक दिग्विजयामुळे उत्साहात असलेल्या भाजपने आपला मोर्चा आता कर्नाटकाकडे वळविला आहे. राज्यातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जणू विडाच उचलला आहे. कर्नाटक राज्यातील भाजप पक्षाच्या वस्तूस्थितीचे अवलोकन करण्यासाठी त्यांनी तब्बल 600 जणांचे पथक राज्य दौऱयावर पाठवून दिले आहे. प्रत्येक जिह्यात 20 जण वस्तूस्थिती जाणून घेणार आहेत.

कर्नाटकात भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांनीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्य भाजप नेत्यांना केवळ बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नी. 2018 मध्ये राज्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीतील जय-पराजयाचा अंदाज घेऊन अमित शहा यांनी स्वतः रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिह्यात 20 याप्रमाणे एकूण 600 जणांना अध्ययन करण्यासाठी जुंपण्यात आले आहे. प्रत्येक जिह्याची भौगोलिक माहिती तेथील जातीय समीकरणे, आर्थिक स्थिती याची माहिती घेतली जात आहे. दाट लोकवस्ती असणाऱया भागातील मंदिरे, हॉटेल, केशकर्तनालय, सभा समारंभ व अन्य ठिकाणी 20 जणांचा गट माहिती जमा करीत आहे. याठिकाणी भाजपविषयी जनतेच्या भावना काय आहेत? सत्ताधारी काँग्रेसविषयी मते कोणती? माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील निधर्मी जनता दलाचे वर्चस्व वाढले आहे का? याविषयी जनतेमध्ये असलेल्या चर्चेचा कानोसा घेतला जात आहे. अशा तऱहेने या पथकांनी जमविलेली माहिती दर आठवडय़ाला अमित शहा यांना पाठविण्यात येत आहे.

पथक कोठे कोठे भाजपविरोधी वातावरणात आहे, याची चाचपणी करीत आहे. त्याठिकाणी भाजपचे समर्थन करणारे कार्यक्रम कसे राबविता येतील? यासंबंधी सविस्तर माहिती संग्रहित केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे पथक राज्यात गुप्तपणे जनमत जाणून घेण्यात गुंतले आहे.

या पथकाने दिलेल्या अहवाल आणि राज्य भाजप नेत्यांनी दिलेल्या अहवालाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. पुढील निवडणूक स्वबळावर निवडून येणे हा एकमेव उद्देश भाजपने बाळगला आहे. राज्यातील नेत्यांनी दिलेली संभाव्य उमेदवारांची यादी आणि केंद्रातील 600 जणांच्या पथकाने दिलेली उमेदवारांची यादी या दोन्हींचा सुवर्णमध्य साधून अंतिम उमेदवार यादी ठरविली जाणार आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून समर्थकांना पाठिशी घालणाऱया नेत्यांना चपराक बसणार आहे.

माहिती गुपित

कर्नाटकातील राजकारणाचे बारकावे जाणून घेतलेल्या अमित शहा यांनी केंद्रातून पाठविलेल्या पथकाकडून माहिती घेत असल्याविषयी राज्य भाजप नेत्यांशी चर्चा केली आहे. या गुप्त हालचालींमुळे राज्य भाजप नेते आश्चर्यचकीत झाले आहेत. स्वतंत्रपणे जमविण्यात येत असलेली माहिती उघड होणार नाही, याची खबरदारीही घेण्यात आली आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!