|Monday, July 31, 2017
You are here: Home » क्रिडा » तामिळनाडूकडे विजय हजारे करंडकतामिळनाडूकडे विजय हजारे करंडक 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिनेश कार्तिकचे दमदार शतक तसेच शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सोमवारी येथे तामिळनाडू संघाने बंगालचा 37 धावांनी पराभव करून विजय हजारे करंडकावर आपले नाव कोरले.

या अंतिम सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्याचा डाव 47.2 षटकात 217 धावांवर आटोपला. त्यानंतर तामिळनाडूने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर बंगालला 45.5 षटकात 180 धावांत उखडले. राष्ट्रीय वनडे क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूचा हा बंगालवर तिसरा विजय आहे. 2008-09 तसेच 2009-10 साली तामिळनाडूने बंगालला पराभूत केले होते. ‘सामनावीर’ दिनेश कार्तिकने 120 चेंडूत 14 चौकारांसह 112 धावा झळकविल्या तर तामिळनाडूच्या क्रिस्ट, मोहम्मद, शहा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तामिळनाडूच्या डावामध्ये दिनेश कार्तिकने 14 चौकारांसह 112 तर बाबा अपराजितने 1 चौकारांसह 32, सुंदरने 2 चौकारांसह 22, गांधीने 3 चौकारांसह 15 आणि क्रिस्टने 10 धावा केल्या. कार्तिक आणि बाबा अपराजित यांनी पाचव्या गडय़ासाठी 85 धावांची भर घातली. तामिळनाडूची एकवेळ स्थिती 10 षटकात 4 बाद 49 अशी केविलवाणी होती. बंगालतर्फे मोहम्मद शमीने 26 धावांत 4, अशोक दिंडाने 36 धावांत 3 गडी बाद केले. तामिळनाडूच्या डावात  20 चौकार नोंदविले गेले.

प्रत्त्युत्तरादाखल खेळताना तामिळनाडूच्या अचूक गोलंदाजीसमोर बंगालचे पहिले 4 फलंदाज 68 धावांत तंबूत परतले होते. सुदीप चटर्जी आणि मुझुमदार यांनी पाचव्या गडय़ासाठी 65 धावांची भागिदारी केली. चटर्जीने 79 चेंडूत 5 चौकारांसह 58, मनोज तिवारीने 46 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32, मुझुमदारने 40 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 24, गनीने 30 चेंडूत 2 चौकारांसह 24, गोस्वामीने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे क्रिस्ट, मोहम्मद, शहा यांनी प्रत्येकी 2 तर शंकर आणि बाबा अपराजित, साई किशोर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बंगालच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू 47.2 षटकात सर्वबाद 217 (दिनेश कार्तिक 112, बाबा अपराजित 32, सुंदर 22, शमी 4/26, दिंडा 3/36).

बंगाल : 45.5 षटकांत सर्वबाद 180 (चटर्जी 58, मनोज तिवारी 32, मुझुमदार 24, गोस्वामी 23, गनी 24, क्रिस्ट, मोहम्मद, शहा प्रत्येकी 2 बळी).

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!