|Sunday, July 30, 2017
You are here: Home » क्रिडा » फेडररची सहाव्या स्थानी झेपफेडररची सहाव्या स्थानी झेप 

वृत्तसंस्था/ पॅरिस

एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या मानांकन यादीत स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकदम सहा स्थानांची झेप घेताना त्याचा प्रतिस्पर्धी राफेल नादाललाही मागे टाकले आहे.

इंडियन वेल्स येथे झालेल्या स्पर्धेत फेडररने नादालला चौथ्या फेरीतच हरविले आणि नंतर स्पर्धेचे जेतेपदही पटकावले. अंतिम फेरीत त्याने आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव केला. ब्रिटनच्या अँडी मरेने ताज्या मानांकनातही अग्रस्थान कायम ठेवले असून इंडियन वेल्समध्ये तो दुसऱया फेरीतच पराभूत झाला होता. सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोव्हिकलाही इंडियन वेल्समध्ये लवकर पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्याने दुसरे स्थान कायम राखले आहे तर वावरिंका तिसऱया स्थानावर आहे. एटीपीने जाहीर केलेली ताजी यादी पुढीलप्रमाणे आहे.

1) मरे 12,005 गुण, 2) ज्योकोव्हिक 8915 गुण, 3) वावरिंका 5705 गुण, 4) निशिकोरी 4730 गुण, 5) मिलोस रेऑनिक 4480 गुण, 6) फेडरर 4305 गुण, 7) नादाल 4145 गुण, 8) थिएम 3465 गुण, 9) मारिन सिलिक 3420 गुण, 10) त्सोंगा 3310 गुण.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!